You are currently viewing भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले; केला श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव

भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले; केला श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव

*भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले; केला श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आज १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा अंतिम फेरीत श्रीलंकेशी सामना झाला. हा सामना जिंकून टीम इंडियाने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने गतविजेत्या पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले होते. कांस्यपदकाच्या लढतीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा पराभव केला. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ११७ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात ९७ धावाच करू शकला.

हँगझोऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर ११७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने २० षटकांत सात गडी गमावून ११६ धावा केल्या. स्मृती मंधानाने सर्वाधिक ४६ धावांची खेळी खेळली. तर जेमिमा रॉड्रिग्जने ४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून ९७ धावाच करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने अंतिम सामना १९ धावांनी जिंकला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा १५ चेंडूत ९ धावा करून बाद झाली. यानंतर स्मृतीने जेमिमासोबत दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. रणवीराने ही भागीदारी तोडली. तीने मंधानाला बाद केले. मंधानाने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. त्याचवेळी ऋचा घोष नऊ धावा करून बाद झाली आणि कर्णधार हरमनप्रीत कौर दोन धावा करून बाद झाली आणि पूजा वस्त्राकर दोन धावा करून बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्जने ४० चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४२ धावांची खेळी केली. दीप्ती आणि अमनजोत प्रत्येकी एक धाव काढत नाबाद राहिले. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी आणि इनोका रणवीराने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाची सुरुवातही खराब झाली. टिटस साधूने चमकदार कामगिरी करत चामरी अटापट्टू (१२), अनुष्का संजीवनी (१) आणि विश्मी गुणरत्ने (०) यांना झटपट तंबूमध्ये पाठवले. यानंतर हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी चौथ्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. पूजाने निलाक्षीला (२३) बाद करून ही भागीदारी भेदली. राजेश्वरीने हसिनीला (२५) बाद केले. दीप्तीने ओशादी रणसिंघे (१९), देविका वैद्यने कविशा दिलहरी (५) याला बाद केले आणि राजेश्वरीने सुगंधिका कुमारीला बाद करत श्रीलंकेच्या आशा संपुष्टात आणल्या. भारताकडून टिटसने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर राजेश्वरीने दोन गडी बाद केले. दीप्ती, पूजा आणि देविका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − three =