You are currently viewing महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी खुले..

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी खुले..

 

कोरोना महामारीमुळे कुलूपबंद असलेले श्री तुळजाभवानीचे मंदिर काल पासून भाविकांसाठी खुले केले आहे. पण दररोज केवळ चार हजार भविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार असून, यामुळे दर्शनासाठी आतुर असलेल्या लाखो भाविकांचा भ्रमनिरास होणार आहे. तुळजापूरची श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. तिच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश , तेलंगना राज्यासह अन्य भागातून मोठ्या संख्येने भाविक येतात. दररोज किमान ३० ते ४० हजार तसेच मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी किमान १ ते २ लाख भाविक तुळजापुरात येत असतात.

 

दर दोन तासाला ५०० भक्तांना येथे मुख दर्शन दिले जाणार असून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. दररोज ४ हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानाने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. तुळजाभवानी मंदिराच्या वेबसाईटवर दररोज १ हजार पेड दर्शन पास तर ३ हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार आहेत. दर २ तासाना ५०० भाविकांना दर्शन मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =