You are currently viewing गोवा सीमेवर असलेला महाराष्ट्राचा तपासणी नाका “अखेर बंद”…

गोवा सीमेवर असलेला महाराष्ट्राचा तपासणी नाका “अखेर बंद”…

आता कोणतीही तपासणी नाही; जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्णय…

बांदा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोवा सीमेवर सटमटवाडी येथे उभारण्यात आलेला तपासणी नाका अखेर बंद करण्यात आला आहे.
रात्री उशीरा हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी आता कोणतीही आडकाठी असणार नाही, याबाबतची माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाले असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा लोकांना होणार आहे. असा विश्वास बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा