You are currently viewing वरदान

वरदान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वरदान*

********

 

तव अधरीचे अमृत प्राशीत प्राशित

हा श्वास चराचरातुनी दरवळावा

 

पाकळी पाकळी मकरंद मधुरम

कळ्याकळ्यातुनी मोदे पाझरावा

 

गंधाळणारा , प्रीतस्पर्ष अनाहत

भाळीच्या भाग्याचे वरदान ठरावा

 

ऋतुऋतु अलगद मिठीत घेता घेता

तव सहवासी जन्म सहज फुलावा

 

देणाराच अनामिक एक कृपाळु

त्याला अंतरी नित्य स्मरत रहावा

*****************************

*रचना क्र. ६३ /४ / ७ / २०२३*

*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞 (9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 8 =