You are currently viewing सारस्वत बँकेच्या विविध शाखांमध्ये १५० पदांकरिता भरती..

सारस्वत बँकेच्या विविध शाखांमध्ये १५० पदांकरिता भरती..

 

*विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आ.वैभव नाईक यांचे आवाहन*

सिंधुदूर्ग :

सारस्वत कॉ. ऑप. बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा कर्नाटक, आणि गुजरात येथील शाखांमध्ये १५० कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग व ऑपरेशन्स लिपिक संवर्ग या पदांकरिता भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक  १९ मार्च २०२१ असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी  https://www.saraswatbank.com या वेबसाईट वर आपले अर्ज भरावेत. ऑनलाईन परीक्षा ०३ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा – २१ वर्षा पेक्षा कमी व ०१/०२/२०२१ पर्यंत २७ वर्षापेक्षा जास्त नसावी. त्याचबरोबर  शैक्षणिक पात्रता वाणिज्य, विज्ञान, अथवा व्यवस्थापन विभागातून किमान प्रथम श्रेणीची पदवी किंवा पदव्यूत्तर आणि पदवी अभ्यासक्रमात किमान द्वितीय श्रेणी असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ज्या स्थानासाठी अर्ज केला आहे त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्र अनिवार्य आहेत. या भरतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे अर्ज भरणे व इतर माहितीसाठी  ९४२११४८१२५ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + two =