You are currently viewing अंध युवा मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

अंध युवा मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

अंध युवा मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

४ ते २४ मे दरम्यान सोलापूर येथे शिबिर; निवास, भोजन व साहित्य विनामूल्य

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्यातील अंध युवा मुलींसाठी विशेष क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ मे ते २४ मे या कालावधीत सोलापूर येथे पार पडणार असून, नवोदित तसेच यापूर्वी कोणत्याही शिबिरात सहभागी न झालेल्या महिला खेळाडूंना यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन, खेळाचे साहित्य, युनिफॉर्म व बूट यांसह सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी खेळाडूंना भेटवस्तूही देण्यात येणार असून, या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी नव्या महिला क्रिकेटपटूंचा शोध घेण्यात येणार आहे.
सदर शिबिरासाठी इच्छुक अंध युवा मुलींनी आपली नोंदणी तातडीने करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी आपले नाव, जिल्हा, अंधत्वाचे प्रमाण तसेच युनिफॉर्म व बूटची साईज कळवणे गरजेचे आहे. तसेच अंधत्वाचे प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी ९८६९३२९१४१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवावा. तसेच blindcabm@gmail.com या ई-मेलवरही नोंदणी करता येणार आहे. सर्व इच्छुकांनी २५ तारखेपूर्वी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा