सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यापारी महेश कोरगावकर यांचे निधन…

सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यापारी महेश कोरगावकर यांचे निधन…

सावंतवाडी

सावंतवाडीतील उभाबाजार येथील प्रसिद्ध व्यापारी महेश मोहन कोरगावकर (वय ५५) यांचे सोमवारी रात्री ९.०० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. उभाबाजार येथील प्रसिद्ध जुने मावसोबा कोरगावकर दुकानाचे महेश कोरगावकर हे मालक होत. हसतमुख आणि मितभाषी असलेल्या महेश यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
सावंतवाडीचे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर आणि बाप्पा नावेकर कॉम्प्लेक्स मधील कोरगावकर हार्डवेअरचे मालक नंदू कोरगावकर यांचे ते मोठे बंधू होते. समता महिला मंडळाच्या माधुरी कोरगावकर यांचे ते पती. महेश यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे उभाबाजार परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा