You are currently viewing इयत्ता 5वी व 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षासाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ

इयत्ता 5वी व 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षासाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

सन 2022 मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी ची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता दि.15जानेवारी ते दि.31 जानेवारी 2022 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शाळेतील जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रविष्ठ व्हावे व आवेदन पत्र भरण्यसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यानी केले .

         पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी 2022 च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या व या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या परीक्षेची नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता दि.1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.  शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता दिनांक 15 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे. या परीक्षेकरिता ज्या शाळांनी उद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक 31 जानेवारी 2022 अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. 31 जानेवारी  नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र किंवा शुल्क भरता येणार नाही. याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

       आवेदनपत्र भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दि. 20 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलेणे क्रमप्राप्त आहे. सबब परीक्षेची सुधारित तारीख  यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व सबंधितानी नोंद घेण्यात यावी .

प्रतिक्रिया व्यक्त करा