You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीची 29 रोजी पहिलीच जिल्हास्तरीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा….

मुक्ताई ॲकेडमीची 29 रोजी पहिलीच जिल्हास्तरीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा….

सावंतवाडी

शहरातील मुक्ताई कॅरम व बुद्धिबळ कोचिंग ॲकेडमीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धिबळ प्रेमींसाठी कै.सौ. सरोज सुर्यकांत पेडणेकर स्मृती प्रित्यर्थ पहिल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. कै.सौ. सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या 81 व्या जयंती निमित्त जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे प्रायोजक सुर्यकांत पेडणेकर असुन आंतरराष्ट्रीय आर्बिटर भरत चौगुले हे पंच आहेत. मुक्ताई ॲकेडमीचे आश्रयदाते राजघराण्यातील सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा रविवार दि.29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 05:30 वाजता ऑनलाईन घेण्यात येणार आहे. स्पर्धेत मुख्य गटात पाच पारितोषिके ठेवण्यात आली असुन विद्यार्थी गटात दहा, पंधरा, एकोणीस वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी दोन आणि विद्यार्थिनी गटात तेरा, एकोणीस वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी दोन अशी एकूण पंधरा रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सहभागी स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी मुक्ताई ॲकेडमीच्या संचालिका सौ. स्नेहा पेडणेकर, टेक्निकल पार्टनर उत्कर्ष लोमटे आणि मिडीया पार्टनर एपीम मालवणी यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी 8007382783 या क्रमांकावर शनिवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत करावयाची आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुक्ताई अॅकेडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर सरांनी केले आहे.
स्पर्धा ऑनलाईन असल्याने नाव नोंदणीसाठी कृपया संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देण्यात यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + seventeen =