^इथे नसे भीती कुणाची^

^इथे नसे भीती कुणाची^

^इथे नसे भीती कुणाची^

इथे नसे भीती कुणाची,
ना अंधाराची,
ना सावलीची.
इथे नसे…

तुझ्या सवे हे दिस जाती,
साथ तुझी ना सोडायची.
तुझ्या सवे रात्री किती,
सहज जागून काढायची.
इथे नसे…

तुझीच साथ आयुष्याची,
ना काळजी मज मनाची.
कितीक गणित मांडायची,
दोघं मिळुनी सोडवायची.
इथे नसे…

संकटे ही येती जाती,
सामोरे त्वां जायची.
हिम्मत असावी मनाची,
कधी न पाठ दावायची.
इथे नसे भीती कुणाची,
ना अंधाराची
ना सावलीची….!!

(दीपी)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा