You are currently viewing वारकरी संप्रदायातील मंडळींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन

वारकरी संप्रदायातील मंडळींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त ह.भ.प. कुर्ले महाराजांचा सत्कार*

*मोदींचा मोठेपण साऱ्या जगाने मान्य केला आहे. —- ह.भ. प. कुर्लेबुवा .*

वेंगुर्ला . दिनांक 28 जून 2023 आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेंगुर्ला तालुक्यातील ह. भ. प. कुर्लेबुवा आणि वारकरी संप्रदायातील मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी चांदेरकर विठ्ठल मंदिर येथे भाजपा कार्यकर्त्ये एकत्रित जमले होते .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप व निवृत्त शिक्षक साहित्यिक अजित राऊळ , विश्व हिंदू परिषदेचे अरुण गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसन्ना देसाई यांनी केले .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे आवर्जून उपस्थित राहून महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती , त्याची आठवण करून देताना देसाई म्हणाले मोदीजींनी संत तुकोबांचा जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा…. हा अभंग मराठीत म्हणून दाखवला होता व वारकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली होती .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कुर्लेबुवा यांचा निवृत्त शिक्षक व साहित्यिक अजित राऊळ यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला .
सत्काराला उत्तर देताना ह .भ . प .कुर्लेबुवांनी मोदीजींच्या कार्याचा व पक्षाचा मनापासून गौरव केला . साऱ्या जगाने मोदीजींचा मोठेपणा मान्य केला असून देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी करून दाखविले आहे . पुढील पंतप्रधान आहे तेच असतील यात शंका नाही अशी भविष्यवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली . तसेच वारकरयांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ” विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना ” सुरू केल्याबद्दल शिंदे – फडणवीस सरकारचे आभार व्यक्त केले . या निमित्ताने मंदिरात फराळाचे वाटप भाजपाच्या वतीने करण्यात आले . याचवेळी मोदीजींच्या नऊ वर्षांच्या कामगिरींचे पत्रक वारकरयांना देण्यात आली .
यावेळी ता.सरचिटणिस बाबली वायंगणकर , नगरसेविका श्रेया मयेकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर – रसीका मठकर – आकांक्षा परब , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व पुंडलिक हळदणकर , भाऊ केरकर , सुनील मठकर , राघवेंद्र जोशी इत्यादी कार्यकर्ते व सहदेव कुर्ले , अनिरुद्ध पेडणेकर , प्रमिला पाटकर , चंद्रभागा मेस्त्री , महानंदा मयेकर , रत्नप्रभा नागवेकर , चंदना कुर्ले , सुप्रीया बांदेकर , सायली मसुरकर , जोस्ना कुबल , रमाबाई तांडेल , राजन पवार , महेंद्र पालव , गजानन कुबल , दिपाली कुबल , रजनी तारी , मयुरी पालव , विठ्ठल वेंगुर्लेकर , शामा रेवणकर इत्यादी वारकरी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 9 =