You are currently viewing देवगड मेडिकल फाउंडेशन येथे “सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन” चे उद्घाटन…

देवगड मेडिकल फाउंडेशन येथे “सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन” चे उद्घाटन…

देवगड

येथील मेडिकल फाउंडेशन येथे “सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन” चे उद्घाटन पडेल पीएचसीच्या आशा सेविका ज्योती गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. समीक्षा संजय टीकम यांच्या देणगीतून हे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन उपलब्ध करण्यात आले आहे.
लाईफ लाईन फाउंडेशन तर्फे देवगड तालुक्यात अनेक रुग्णांना उपयोगी उपक्रम गेली कित्येक वर्ष हाती घेतले जातात. आतापर्यंत या ट्रस्टच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत .या उपक्रमाचा एक भाग म्हणून देवगड मेडिकल फाउंडेशन येथे एक सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन चे आज उद्घाटन करण्यात आले. रुग्णांना केवळ पाच रुपयात उत्तम दर्जाचे सॅनिटरी पॅड या व्हेडिंग मशीन द्वारा घेता येईल. पाच रुपयाचे नाणे टाकून या वेंडिंग मशीन मधून आपोआप एक सॅनिटरी पॅड मिळू शकते .स्त्रियांसाठी उपयुक्त अशा या वेंडिंग मशीनचे उद्घाटन पडेल पीएचसीच्या आशा सेविका ज्योती गावकर पडेल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला अनेक महिला आवर्जून उपस्थित होत्या. भविष्यात असे समाजोपयोगी बरेच उपक्रम हाती घेण्यात येतील असे डॉ. मंजुषा आठवले यांनी जाहीर केले. मुंबई येथे वास्तव्य असलेल्या समीक्षा संजय टीकम यांच्या देणगीतून हे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन उपलब्ध करण्यात आले आहे. देणगीदार समीक्षा टिकम यांनी देवगड सारख्या ग्रामीण भागात आरोग्य विषयक सुविधा निर्माण करणे आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणे या लाईफ लाईन फाउंडेशनच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
फोटो- देवगड मेडिकल फाउंडेशन येथे सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन चे उद्घाटन समारंभा प्रसंगी उपस्थित डॉ. मंजुषा आठवले व पडेल पीएचसीच्या आशा सेविका ज्योती गावकर आदी.

प्रतिक्रिया व्यक्त करा