वैभववाडीत ८ डिसेंबरला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
आनंदीबाई रावराणे यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन;
विजेत्यांना ३ हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिके
वैभववाडी :
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी येथे आनंदीबाई रावराणे यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. ८ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवी आणि इयत्ता आठवी ते बारावी असे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच चौथ्या ते सहाव्या क्रमांकाच्या खेळाडूंना उत्तेजनार्थ पदके देण्यात येणार असून सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
