You are currently viewing कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीर नालाबंदिस्तीच्या कामाचा शुभारंभ

कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीर नालाबंदिस्तीच्या कामाचा शुभारंभ

पावसाळ्यातील समस्यांवर निघणार कायमस्वरूपी तोडगा; नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

सावंतवाडी : शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीरकडे जाणाऱ्या नालाबंदिस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील या विकासकामाचा भूमिपूजन समारंभ नगराध्यक्षांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून उत्साहात पार पडला.

या परिसरातील नागरिकांना तसेच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना उघड्या नाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता हा नाला बंदिस्त करण्याची मागणी आणि गरज महत्त्वाची ठरली होती. परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.

नगराध्यक्षांच्या हस्ते विधिवत पूजन करून विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला. या नालाबंदिस्तीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होणार आहे.

यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर, दुलारी रांगणेकर, शर्वरी धारगळकर, सिद्धार्थ भांबुरे आदी नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांची मोठी समस्या दूर होणार असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा