You are currently viewing अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांगलीत ‘ताणतणाव व्यवस्थापन’ कार्यशाळेचे मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने आयोजन

अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांगलीत ‘ताणतणाव व्यवस्थापन’ कार्यशाळेचे मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने आयोजन

सांगली / प्रदीप जोशी :

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि कार्यक्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता महापालिकेच्या सभागृहात (GB Hall) ‘ताणतणाव व्यवस्थापन’ विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत मनशक्ती प्रयोगकेंद्राचे गीतेश सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताणतणाव व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक विचारसरणी आणि दैनंदिन कामकाजातील ताण प्रभावीपणे हाताळण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कामाच्या ठिकाणी निर्माण होणारा ताण, वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील समतोल, मनःशांती, सकारात्मकता तसेच ताणतणावाचा दैनंदिन कार्यक्षमतेवर होणारा परिणाम याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन व उपायांचा अंगीकार करून कामकाज अधिक उत्साहपूर्ण आणि प्रभावीपणे करण्याबाबत उपस्थितांना प्रेरित करण्यात आले.

या कार्यशाळेस महापालिका आयुक्त श्रीमती संजीता महापात्रा, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व विभागप्रमुख तसेच महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य, कार्यक्षमता आणि सकारात्मक कार्यसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा