मसदे-वडाचापाट येथील श्री स्वामी समर्थ मठात २४ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव
जलाभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, भजन आणि दीपोत्सवाचे आयोजन; भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
मालवण :
श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मालवण तालुक्यातील मसदे-वडाचापाट येथील श्री स्वामी समर्थ मठात २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ८.३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती व स्वामी पादुकांवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक व पूजन, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, ११.३० वाजता नैवेद्य व आरती, तर दुपारी १ वाजता महाप्रसाद व अन्नदान होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता सुस्वर भजन, ६.१५ वाजता त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि ७ वाजता दैनंदिन आरती होणार आहे. यावेळी श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, त्रिंबक-बगाडवाडी यांचे बुवा कु. रियांश त्रिंबककर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचा व दीपोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ, मसदे-वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
