You are currently viewing तिथवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी!

तिथवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी!

तिथवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी!

वैभववाडी

विनायक राऊत, अरुणभाई दूधवडकर, वैभव नाईक यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती; मुंबईसह जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

तिथवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिथवली शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता तिथवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यास शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते व कोल्हापूर लोकसभा प्रमुख अरुणभाई दूधवडकर, कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तिथवली गावचे सुपुत्र तथा लालबाग-परळचे नगरसेवक किरण तावडे आणि धारावी विधानसभा प्रमुख वसंत नकाशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण रावराणे, वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, वैभववाडी तालुका संपर्कप्रमुख विठ्ठल बंड, महिला तालुका संपर्कप्रमुख लक्ष्मीप्रभा जाधव, सहसंपर्कप्रमुख पंढरीनाथ तावडे व प्रसाद नारकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तिथवली गावामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे, शिवसैनिकांना एकत्रित आणणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढा उभारणे या उद्देशाने या शाखेची स्थापना करण्यात येत आहे. या शाखेच्या माध्यमातून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

या उद्घाटन सोहळ्यास तिथवली गावातील तसेच मुंबई व इतर भागांतून येणाऱ्या तमाम शिवसैनिकांनी, युवासैनिकांनी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका संघटक बाबा मोरे, उपजिल्हा संयोजक वसंत खानविलकर, तालुका सचिव गुलजार काझी, कोळपे विभागप्रमुख जितेंद्र तळेकर, तिथवली शाखाप्रमुख चिंतामण (नाना) जैतापकर, पांढरीनाथ सुर्वे, समीरा घुगरे, योगिता इस्वलकर आणि अजय रोग्ये यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा