*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शलोमित खान यांनी आज 19 नोव्हेंबर पुरुष दिनानिमित्त लिहिलेली अप्रतिम कविता*
*पुरुष*
पुरुष नाव उच्चारताच सांगा
कोणता विचार येतो मनात
पिता येतो की येतो पुत्र
भाऊ येतो की येतो मित्र
येतो मनात पती जीवन साथी
की येतो स्वप्नांचा राजपुत्र.
पुरुष असतो घराचे छत
सर्वांच्या रक्षणाचे घेतो व्रत
स्त्री रडून मोकळे करते मन
पुरुष मात्र राहतो अगदी शांत
मनातले वादळ मनात लपवतो
सगळ्यांसमोर हसत राहतो
लागू देत नाही संकटाचे चाहूल
जपून चालतो एक एक पाऊल
आईची करतात सर्वच प्रशंसा
वडिल मात्र दुर्लक्षित कसा
त्याचे प्रेम त्याचा त्याग सांगा
तुम्ही विसरून जातात कसा.
या सर्वांमध्ये पुरुषाचे एक रूप
कधीच विसरता येणार नाही.
तो पुत्र म्हणून श्रेष्ठ होता, आहे
आणि पुढेही राहणार आहे.
एक पुत्र होता श्रावण बाळ
आई बापाची सेवा करे सर्वकाळ
एक पुत्र होता संत पुंडलिक
आई बाबांची करताना सेवा
विटेवर उभे केले त्याने देवा
एक पुत्र होता प्रभू श्रीराम
पित्याच्या वचनासाठी
भोगीला त्याने वनवास
एक पुत्र होता प्रभू श्रीकृष्ण
वनात जाऊन केले गोपालन
यशोदानंदासाठी बनवला दास
एक पुत्र होता वीर शिवाजी
मातेची इच्छा पुरवण्यासाठी
बांधिले त्यांनी स्वातंत्र्य कंकण
एक पुत्र होता वीर संभाजी
प्राण्यांची दिली हसून आहु ती
पण केले धर्माचे रक्षण.
एक पुत्र आहे भूमिपुत्र किसान
भुकेला राहतो तो स्वतः
पण सर्वांना देतो अन्नाचे दान.
एक पुत्र आहे तो वीर जवान
मातृभूमीचे फेडण्यासाठी पांग
उभा राहतो ठेवूनच जाग
कधी मातृभूमी रक्षणासाठी
देतो हसत हसत आपले प्राण.
अशा सर्व पुरुषांसाठी आज
शलोमिताचे कोटि-कोटि प्रणाम
शब्द रचना
साकव्य मीत शलोमित
