*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी बापट यांची स्वादिष्ट पाककृती*
*लाल भोपळ्याच्या सालीची चटणी*
*साहित्य*
लाल भोपळ्याच्या बारीक चिरलेल्या साली 1 वाटी, तीळ 1 मोठा चमचा भरून ,सुक्के खोबरे किसलेले छोटी वाटी भरून, सुक्या लाल मिरच्या 4 , मीठ चवी नुसार, 2 चमचे गोडेतेल
*कृती*
सर्वात आधी कढई मध्ये तेल घालून तीळ परतून घ्यायचे. मग सुक्के खोबरे, सुक्या लाल मिरच्या घालून ते ही परतून घ्यायचे.ते सगळे बाजूला काढून मग साली परतून घ्यायच्या.आता सगळे एकत्र करून त्यात मीठ घालायचे आणि मिक्सर मध्ये बारीक करायचे.
आवडत असेल तर परत थोडे तेल गरम करून फोडणी करून घ्यायची. आणि ती वाटलेल्या चटणी वर घालायची.
खूप छान चटणी तयार होते.
*सौ मानसी बापट बंगलोर*
