You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी.

सावंतवाडी

माजगांव येथील सुप्रसिद्ध शिल्पकार काका सावंत व पेंटर एस.टी सेवानिवृत्त मंगेश सावंत यांच्या विनामूल्य सहकार्यातून मोती तलावाच्या काटी नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात आली.
तीन वर्षांपूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सदर पुतळ्याची रंगरंगोटी केली होती त्यासाठी सुद्धा काका सावंत यांनी विनामूल्य पेंटिंग करून सहकार्य केले होते परंतु कालांतराने पुतळ्यावरील रंग खराब झाल्या कारणाने सदर पुतळा दिसायला बरा वाटत नव्हता याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी पुन्हा एकदा या पुण्यकामास पुढाकार घेऊन युवराज लखन राजे यांच्या परवानगीने सदरचे पुतळ्याचे काम विनामूल्य पूर्ण करून दिले यासाठी नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक म्हापसेकर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा