You are currently viewing दिविजा आश्रमातील आजी-आजोबांसाठी आयुर्वेदिक औषधांची भेट!

दिविजा आश्रमातील आजी-आजोबांसाठी आयुर्वेदिक औषधांची भेट!

दिविजा आश्रमातील आजी-आजोबांसाठी आयुर्वेदिक औषधांची भेट!

उद्योजक संदीप चौकेकर आणि वेक्सॉन कंपनीच्या प्रेरणा मयेकर यांचा सामाजिक उपक्रम; दिवाळीपूर्वी आरोग्याची घेतली काळजी

कणकवली :

असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा आश्रमातील आजी-आजोबांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून आणि वेक्सॉन कंपनीच्या प्रेरणा मयेकर यांच्या सहकार्याने आयुर्वेदिक औषधांची भेट देण्यात आली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी ही औषधे आश्रमाचे व्यवस्थापक संजय शेट्ये यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी कलमठचे ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, सूर्यकांत हुन्नरे, पत्रकार तुषार हजारे, नितीन उर्फ आबा मेस्त्री, भूषण ठाकूर, सिद्धेश घाडीगावकर, प्रसाद मठकर, निखिल हजारे, राहुल कडुलकर, राज सावंत, नील लोकरे, निश्चिय हुन्नरे यांच्यासह वृद्धाश्रमातील कर्मचारी उपस्थित होते.

आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापक संजय शेट्ये यांनी संदीप चौकेकर आणि प्रेरणा मयेकर यांचे आभार मानले. दिवाळीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा