You are currently viewing सहयोग फाउंडेशन, यमुनानगर, निगडी दिवाळी फराळ संकलन व वाटप

सहयोग फाउंडेशन, यमुनानगर, निगडी दिवाळी फराळ संकलन व वाटप

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

यमुनानगर निगडी : दरवर्षीप्रमाणे यंदा समाजातील दातृत्व व्यक्तींकडून फराळासाठीचे संकलन करून आपली दिवाळी गोड होण्यापूर्वी अशा लोकांची दिवाळी आपण गोड करतो की ज्यांच्या कानी बऱ्याच वेळा गोड हा शब्द सुद्धा पडत नाही अशा आदिवासी वनवासी पाड्यांवर जाऊन त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्याचा हा उपक्रम 2007 पासून चालू केला आहे.

मुळशी तालुक्यातील लव्हार्डे तसेच लवासा सिटीच्या पुढे कातकर वस्ती पाडे यावर जाऊन तेथील नागरिकांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.१०० कुटुंबाला (कातकरी वस्ती मूगाव- ६८,कातकरी वस्ती भोडे- १५,कातकरी वातुंडे वस्ती -१७) लाडू ,चिवडा, शंकरपाळी, चकली, आकाश कंदील आणि पणत्या देऊन त्यांच्या दारीची दिवाळी आनंदात साजरी करण्यास प्रोत्साहित केले .

सहयोग फाउंडेशन चे नंदकुमार तथा आप्पा कुलकर्णी , अनिल तथा अण्णा आढी, धनाजी शिंदे, अशोक वाळके पाटील, दिनेश कुलकर्णी सर, जगदीश साबळे , आदित्य कुलकर्णी, महेश नांगरे, श्री मुरकुटे पाटील ,सोमनाथ काळभोर पाटील, प्रकाश साकोरे, गंगाधर वाघमारे ,ज्येष्ठ नागरिक श्री गजानन ढमाले काका यांनी परिश्रम घेतले.

मुळशी तालुक्यातील निवृत्त शिक्षक श्री सुदाम पवार सर अआशा वर्कर अर्चनाताई चवले व उषा ताई कचरे यांचे सहकार्य लाभले

प्रतिक्रिया व्यक्त करा