You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून मराठी शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेट वस्तूंचे वितरण.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून मराठी शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेट वस्तूंचे वितरण.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून मराठी शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेट वस्तूंचे वितरण.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आरोग्य क्षेत्राबरोबरच आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर आहे. सावंतवाडी तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे मराठी शाळेंना भेट देऊन त्या शाळेमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेटवस्तू सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा माध्यमातून दिल्या जातात. सावंतवाडी शहरातील तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो. सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 5 या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या बरोबरच बसण्यासाठी चटई देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, हेलन निबरे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला तेव्हा शाळेतील शिक्षिका संगीता भिरवंडेकर, शुभलता सुखी यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानते. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे शरदिनी बागवे, हेलन निबरे, उपाध्यक्ष विजय वाडकर व शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा