You are currently viewing उद्या होणाऱ्या मत्स्यविक्रेत्या महिलांच्या आक्रोश आंदोलनास जिल्हा भाजपाचा पाठिंबा….

उद्या होणाऱ्या मत्स्यविक्रेत्या महिलांच्या आक्रोश आंदोलनास जिल्हा भाजपाचा पाठिंबा….

भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर

मालवण

उद्या बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी मत्स्यव्यवसाय कार्यालय मालवणसमोर होणाऱ्या महिला मत्स्यविक्रेत्या महिलांच्या आक्रोश आंदोलनास जिल्हा भाजपाचा पाठिंबा असल्याची माहिती भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात मोंडकर म्हणाले, राज्य शासनाने मच्छीमार महिलांसाठी जाहीर केलेल्या मत्स्य पॅकेजमध्ये मासे विक्रेत्या महिलांसाठी दोन मत्स्य पेट्यांची तरतूद करण्यात आली आहे.

यासाठी ६ हजार रुपये प्रति मत्स्यविक्रेता मिळणार आहे. परंतु मासे विक्रेत्या महिलांना आज आर्थिक साह्याची नितांत गरज आहे. जिल्हयाच्या किनारपट्टीवर ओखी, निसर्ग, क्यार वादळ आणि कोरोना व्हायरसमुळे आज मच्छीमार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मत्स्यविक्री करणाऱ्या महिलांना रोख रक्कम दिल्यास खऱ्या अथाने त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांचा आक्रोश थांबवून त्यांच्यासाठी शासनाने अपेक्षित निर्णय घ्यावा, अशी मागणी ही मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 20 =