You are currently viewing दिवाळी
Oplus_16908288

दिवाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दिवाळी*

 

लक्ष दिप उजळीत

आली दिवाळी घरा

नभी कंदील झुलतो

सण करू या साजरा

 

लख्ख प्रकाशाने न्हाली

तेजोमय वसुंधरा

नाना रंगानी सजवुया

घराचा हा उंबरा

 

अश्विन शुद्ध द्वादशीला

दारी सजली गोमाता

करू पुजन तयांचे

गाय वासरू दिसता

 

नांदा दिप देव्हाऱ्यात

दारी पणती सजवू

लक्ष दिवे उजळतील

दिवा दिव्याने पेटवू

 

स्नेह प्रेमाचा झरा

अंतरात जागविता

काय वर्णू दीपोत्सव

विठू पंढरीचा आळविता

 

*शीला पाटील चांदवड*

प्रतिक्रिया व्यक्त करा