You are currently viewing पौष्टिक लाडू

पौष्टिक लाडू

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी लिखित स्वादिष्ट पाककृती*

 

*पौष्टिक लाडू*

 

*साहित्य*_दोनशे ग्रॅम सातूचे पीठ, एक वाटी किसलेले सुके खोबरे, दोन वाटी मखाने, एक वाटी ओट्स, मुठभर बदाम, काजू पिस्ते आवडीप्रमाणे घेणे. आवडीप्रमाणे मगज बी, टरबुजाच्या बिया वगैरे, वेलची जायफळ पावडर, खजूर तुमच्या आवडीप्रमाणे, खारीक पावडर अंदाजे दीड वाटी, अर्धी वाटी गूळ, लागेल तसे साजूक तूप

 

*कृती*_खजूर गुळ वेलची पावडर सोडून.. सर्व वेगवेगळे जरा भाजून घेतले. नंतर मिक्सरमधून सर्व एकत्रित बारीक केले त्यामध्ये गूळ खारीक पावडर वेलची पावडर थोडे तूप असे घातले. एका परातीत सर्व काढून वरून लागेल तसे तूप गरम करून त्यात घालून लाडू वळले. एकदम मस्त तोंडात टाकताच विरघळतील असे पौष्टिक लाडू झाले.

 

*टीप*_तुम्हाला हवे तसे याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हवे असेल तर पिठीसाखर आणि फक्त गुळ असेही तुम्ही करू शकता.

लाडू मात्र छानच होणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा