You are currently viewing दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट ग्रामपंचायतीचा स्वच्छतेचा आदर्श उपक्रम!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट ग्रामपंचायतीचा स्वच्छतेचा आदर्श उपक्रम!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट ग्रामपंचायतीचा स्वच्छतेचा आदर्श उपक्रम!

सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वतः उतरून केली परिसराची स्वच्छता; अजित नाडकर्णी यांच्याकडून कौतुक

फोंडाघाट :

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या वतीने परिसर स्वच्छता आणि फुलझाडांच्या निगेसाठी विशेष पुढाकार घेण्यात आला. विशेष म्हणजे, केवळ सूचना न देता सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभागी होत एक नवा आदर्श निर्माण केला.

सरपंच सौ. संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश राणे आणि सदस्य पिंटू पटेल यांनी एकत्र येत परिसराची स्वच्छता केली. तसेच परिसरातील फुलझाडांची निगा राखत परिसर अधिक सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले.

ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांनी विशेष कौतुक केले. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात असताना फोंडाघाट ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेऊन केलेले हे काम निश्चितच भूषणावह आणि इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा