You are currently viewing मदर क्वीन्स स्कूलच्या आराध्या गावडेचे कराटे स्पर्धेत यश
Oplus_16908288

मदर क्वीन्स स्कूलच्या आराध्या गावडेचे कराटे स्पर्धेत यश

जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीची विद्यार्थिनी आराध्या गावडे हिने उल्लेखनीय यश संपादन केले.

आराध्याने १४ वर्षांखालील मुलींच्या वयोगटातील ४२ ते ४६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

आराध्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, क्रीडाशिक्षक भूषण परब तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी तिचे अभिनंदन केले.

तसेच आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आराध्याला शुभेच्छा देत तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा