You are currently viewing कणकवली मतदारसंघासाठी राज्‍याकडून २ हजार २१० कोटी रूपये निधी

कणकवली मतदारसंघासाठी राज्‍याकडून २ हजार २१० कोटी रूपये निधी

ठाकरे सेनेकडील सरपंच आमच्याकडे आले तर विकास निश्चितच होईल- आमदार नितेश राणे यांची ग्वाही

कणकवली

कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघाच्या विकासासाठी राज्‍य शासनाने तब्‍बल २ हजार २१० कोटींचा निधी दिला आहे. त्‍यानुसार लवकरच टेंडर प्रक्रिया होऊन विकास कामं सुरू होतील. त्‍यामुळे आता ठाकरे सेनेकडे ज्‍या ग्रामपंचायती आहेत, त्‍या सरपचांनी जरूर विचार करावा. हे सरपंच आमच्याकडे आले तर त्‍या गावांचा विकास निश्‍चितपणे होईल. ती जबाबदारी आम्‍ही घेऊ अशी ग्‍वाही आमदार नीतेश राणे यांनी आज दिली.

येथील प्रहार भवनमध्ये श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, राज्‍यात ठाकरे सरकार असताना मला त्‍या सरकारबरोबर संघर्ष करायला लागायचा. इथे उदध्व ठाकरे यांच्या विचारांचा पालकमंत्री असल्‍याने माझ्या मतदारसंघावर सातत्‍याने अन्याय होत रहायचा. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील मतदारांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला. त्‍यामुळेच राज्‍यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्‍यानंतर मी माझ्या मतदारसंघाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकलो आहे.

सन २०२३ आणि २०२४ च्या बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम या हेडखाली या मतदारसंघासाठी २३८ कोटी आम्‍हाला मिळालेले आहेत. या २३८ कोटीच्या कामांची यादी प्रसार माध्यमांना देणार आहे. जेणेकरून आमच्या विरोधकांना कळेल की ही कामे आमच्या नेतृत्‍वामुळे मिळाली आहेत. आमच्या विरोधकांना नेहमीच दुसऱ्या मुलांचं बारसं करण्याची सवय. आम्‍ही कामं आणणार हे नारळ फोडणार आणि कामं आम्‍हीच केली असं सांगणार सन २०२३-२४ या वर्षासाठी २३८ रूपये प्राप्त झाले. तर २०२२-२३ मध्ये १५० कोटी रूपयांचा निधी आला. तर नाबार्ड अंतर्गत १० कोटी मिळाले आहेत.

कणकवली नगरपंचायत सातत्‍याने आमच्यावर अन्यायच व्हायचा. ठाकरे सरकार असताना तर अतीअन्याय झाला. पण आमचे सरकार आल्‍यानंतर नवीन धबधबा प्रकल्‍प मार्गी लागला. या कृत्रीम धबधब्‍याचे लवकरच भूमिपूजन होईल. स्पोर्ट कॉम्प्लेक्‍सचेही काम पूर्ण होत आहे. रिंगरोड देखील मार्गी लागतोय. तसेच इतर असंख्य विकास कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. नागरी सहाय्य योजना कणकवलीसाठी शासनाने साडे बारा कोटी रूपये दिले आहेत. तर जिल्‍हा वार्षिक पर्यटनसाठी १० कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
राणे म्‍हणाले, देवगड नगरपंचायत मध्ये लोकांनी आम्‍हाला नाकारल. सध्या ठाकरे सेनेची सत्ता तेथे आहे. तरीही लोकांशी, जनतेशी आम्‍ही बांधील आहोत. तेथील जनतेवर अन्याय होता नये. तेथील नेतृत्‍व कमी पडले असले तरी आम्‍ही आमच्या नगरपंचायतीसाठी २ कोटी ७५ लाख रूपये आणले आहेत. तर नगरोत्थान साठी ४ कोटी ३५ लाख प्राप्त झाले आहेत. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीसाठी अडीच कोटी आणले आहेत. तर नगरोत्‍थानअंतर्गत १ कोटी ३० लाख निधी आला. जिल्‍हा वार्षिक योजना अंतर्गत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या कणकवली मतदारसंासाठी २५ कोटी मिळाले. डोंगरी विकास निधीमधून आम्‍ही सुचविलेल्‍या कामांसाठी ३५० कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. तळेरे विजयदुर्ग रस्त्यासाठी २५० कोटी रूपये मिळाले आहेत. गगनबावडा तळेरे रस्ता मुख्य घाट रस्तासाठी त्‍याला २५० कोटी, देवगड निपाणी फोंडाघाट रस्त्यासाठी ८३९ कोटी मिळाले आहेत. पंतप्रधान गामडक योजना ४२ कोटी िमळाले. मुख्यमंत्री ग्रामसडक सयोजना १६ कोटी मिळाले. २५-१५ योजनेसाठी ५ कोटी मिळाले. अल्‍पसंख्यांक मतदार संसाठी १ कोटी, समाजकल्‍यासाठी १ कोटी पाटबंधारे विभागासाठी छोटे बंधारे यासाठी ३२५ कोटी माझ्या मतदारसंघासाठी मिळाले आहेत

नितेश राणे म्‍हणाले, ही कामं लवकरच सुरू होतील. वर्क ऑर्डर निघतील पण कामाच्या दर्जाची जबाबदारी आमची असेल. नुसतं पैसे आणणं महत्‍वाचं नाही. तर कामाचा दर्जा त्‍याच पद्धतीने व्हायला हवा यावर आमचं लक्ष असेल. ही कामं आम्‍ही आणि आमच्या सरकारने आणलेली आहेत. मी सांगितल्‍यामुळे आहेत. म्‍हणूनच मी ग्रामपंचायत वेळी आवाहन केलं होतं. जे निधी आणत असतील त्‍यांच्यासोबतच राहावं. उर्वरित ग्रामपंचायत ठाकरे सेनेकडे आहेत त्‍यांच्याही सरपंचांनी विचार करावा. त्‍यांना आपल्‍या गावात विकास हवा असेल तर आमदार ज्‍या पक्षात असेल त्‍या पक्षात आलात तर विकास करण्याची जबाबदारी माझी असेल असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 10 =