You are currently viewing डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कणकवली उपजिल्हा रुग्णालयाबाहेर शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कणकवली उपजिल्हा रुग्णालयाबाहेर शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कणकवली उपजिल्हा रुग्णालयाबाहेर शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

कणकवली

डॉक्टरांची भरती न करणाऱ्या सरकारचा करायचं काय? या आरोग्यमंत्र्यांचं करायचं काय? अशा अनेक घोषणा देत कणकवली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाबाहेर या धरणे आंदोलनात अपुरा आरोग्य कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा, रुग्णांची होत असलेली हेळसांड या संपूर्ण विषयावर धरणे आंदोलन छेडुन रिक्त पदे भरती, आरोग्य व्यवस्था सुधारणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या धरणे आंदोलनामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर अनुप वारंग, हरकुळ सरपंच आनंद ठाकूर, बेनी डिसोजा, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, वैदेही गुडेकर, संजना कोलते, धनश्री मेस्त्री, वैभव मालडकर, संजय पारकर, जय शेट्ये, ललित घाडीगावकर, तात्या निकम, युवासेना जानवली विभाग प्रमुख किरण वर्दम, भालचंद्र दळवी, गौरव हर्णे माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, अमोल राणे, काका राणे, संतोष परब आदि उपस्थित होते. या चर्चेदरम्यान उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनिकेत किर्लोस्कर, व मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देठे, विनोद चव्हाण, महिला पोलीस स्नेहा राणे, मंगेश बावदने, किरण मेथे अमित खाडये आदींचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =