*ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना व अशोक जवळेकर यांनी केलेलं रसग्रहण*
*रास्ते बदलते हैं…!!*
कुछ ख़्वाब आँखों में आज भी पलते हैं,
कुछ दर्द वक़्त के साथ कहाँ बदलते हैं।।
ख़ामोश लबों पर कितने सवाल रहते हैं,
नैनों में मगर कितने मौसम ढलते हैं।।
कल तक जो अपने थे, आज अजनबी हैं,
हालात के आगे रिश्ते कहाँ सँभलते हैं।।
मंज़िल वही रहती, राहें बदलती हैं,
इंसान के इरादे अक्सर बदलते हैं।।
कुछ लोग बिछड़कर भी दिल में ठहरते हैं,
वो दूर होकर भी हर पल साथ चलते हैं।।
यादों की छाँव में जब शाम उतरती है,
सूखे हुए पत्ते भी बीती बातें कहते हैं।।
चल फिर उसी पेड़ की छाँव में बैठें,
देखें कि कहाँ से रास्ते बदलते हैं।।
‘रास्ते बदलते हैं’ बस राहों की बात नहीं,
इंसान बदल जाए तो रिश्ते बदलते हैं।।
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
कविता समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे माझे हे लेखन.
रास्ते बदलते है…! (कवयित्री:प्रज्ञा घोडके) या कवितेची भाषा सहज समजण्या सारखी आहे. तत्वज्ञान सांगणे, मार्गदर्शन करणे हे हेतू नाहीत.
शीर्षक सुचवते की रस्ते बदलत रहातात. मार्ग बदलले की साध्य बदलते किंवा तेच राहू शकते.
काही जुनी स्वप्ने डोळ्यात, मनात कालावधी नंतरही राहतात. उदा.कलाकार होण्याचे स्वप्न, परदेशी पर्यटन करण्याचे स्वप्न. इ.पण दुसऱ्या ओळीत
“कुछ दर्द वक़्त के साथ कहाँ बदलते हैं।”
काळ जात राहिला तरी दु:ख, वेदना बदलत नाहीत, वास्तविक काळ सर्व गोष्टीवर औषध मानले जाते. याचाच अर्थ कवयित्री चा निर्देश वर उल्लेखिलेल्या सर्व साधारण स्वप्नां पेक्षा काही कमी न झालेल्या वेदनांकडे अधिक आहे.
सर्वसाधारणपणे प्रेम विषयक कविता अधिक लिहिल्या जाते, त्यामुळे हा दर्द प्रेमाचा असेल अशी शंका येते. अर्थात हा निकष बरोबर नाही.
प्रेमात किंवा इतर संबंधात प्रकट न बोललेच अधिक असते. अशावेळी अनेक प्रश्न दोन्ही बाजूने अनुत्तरीत असतात.कदाचित त्या मागचे सत्य कधीच उजेडात येत नसावे.
“नैनों में मगर कितने मौसम ढलते हैं।”
ही ओळ त्या दु:खाच्या अनेक
लाटा, आवेग येऊन गेलेले असतात असे सूचित करते तसेच काळ व्यतित होत असल्याची ही सूचक आहे.
नंतरच्या दोन ओळी कवितेत निश्चितता आणतात. कारण काल आपले असणारे आज अनोळखी झाले आहेत.
म्हणजे अपेक्षा भंग झालेला आहे किंवा कुटुंब नाते संबंधातील असमाधान किंवा व्यावहारिक गोष्टीतील निराशा असू शकते.
कारणे अनेक असू शकतात. तसे झाले की परस्पर अविश्वासाची भावना निपजते व नाते संबंध दुरावतात.ही प्रक्रिया गुंतागुंतीची असते. परंतू शेवटी,
“हालात के आगे रिश्ते कहाँ सँभलते हैं।”
इथे प्रियकराला अथवा संबंधितास दोष दिला जात नाही. तर परिस्थितीला दोष दिला जातो. परिस्थिती विरोधी असेल तर नाते संबंध टिकविणे अवघड असते.
पुढे मूळ उद्दिष्ट (मंज़िल वही रहती) बदलत नाही. ध्येय तेच रहाते.
प्रेम व्यक्तिचे न रहाता कुटुंबाचे किंवा देशप्रेमापर्यंत जाऊ शकते. म्हणजे समकेंद्री वर्तूळ विस्तारित होते. परंतू माणसाच्या मनाचे निश्चित सांगता येत नाही उलट
“इंसान के इरादे अक्सर बदलते हैं।”
ही शक्यता असते.
याचा अर्थ नुसते मूळ विचाराचा, केलेल्या अपेक्षांचा, साध्याचा पण परिघ वाढतो अथवा संकोच होतो. एखादा माणूस खूप क्रियाशील असतो. काही कारणाने दुखावला गेल्यास तो कोणत्याच कामात लक्ष घालत नाही. हे सहज सुचलेले उदाहरण.
सुरुवातीस वस्तू पाहिजे असे वाटते, त्या मिळत गेल्या की वैभवशाली जीवन जगावे असे वाटते.सुरुवातीस विरोध केला जातो, नंतर समज वाढू शकते अथवा उलट होऊ शकते. म्हणजे उद्दीष्टे नेहमी बदलतात.
नंतरच्या ओळीत काही कारणाने दूर गेलेल्या व्यक्ती (प्रेमिक, मित्र अथवा निकटची व्यक्ती) मनात घर करुन राहतात. त्यांच्या बाबतीत असे होते कारण त्या विशेष वाटलेल्या असतात किंवा त्यांच्या कृति आवडलेल्या असतात.
मित्र-मैत्रिणींच्या आठवणी येत रहातात. त्यात दिवस जातो. संध्याकाळ त्याच मग्न अवस्थेत व्यतीत होते.
सभोवतालच्या सर्व गोष्टी, निसर्गाचा प्रत्येक घटक मागच्या घडलेल्या गोष्टींची आठवण करुन देतो. हे सूखे पत्ते या रुपकातून व्यक्त होते. वाळलेली पाने पूर्ण रसहीन होतात. उन्हात करपतात. इथे नियंत्रणात नसलेली परिस्थिती प्रभावी असल्याचे सूचित होते.
माणसाची आशा वाटणे सुटत नाही. म्हणून पुन्हा एकदा त्या दिवसांचा आनंद घ्यावा ही इच्छा कायम रहाते. परत आठवण्यासाठी दोघांनी आधी ज्या ठिकाणी स्वप्ने रंगवली तिथे एकत्र येऊ असे सुचवले जाते.
प्रत्येक दुरावलेल्या प्रेमिकांच्या आयुष्यात एक क्षण विभक्त होण्याचा तीव्र दाहक अनुभवाचा आयुष्यभर रहातो. तो जर टळला असता, किंवा ती चूक झाली नसती तर चांगले झाले असते असे वाटत असते. परंतू सत्य विपरीत असते.
परंतू त्या बिंदूवर जाऊन सर्व समजून घेऊन बरोबर योग्य कृती करु, कुठून रस्ते बदलले ते बघू असे ती म्हणते.
शेवटी रस्ते बदलतात, मार्ग बदलतात त्याहिपेक्षा माणूस बदलला की नाते बदलते या वैश्विक सत्या पर्यंत कविता पोहोंचते. हे सर्व संबंधाना लागू पडते. फक्त प्रेम संबंधांना नव्हे. उदा. आर्थिक स्थिती परस्परांशी वागणे बदलू शकते. भाऊ,आई ,वडिल, काही मतभेदामुळे वेगळे होऊ शकतात. याचा अर्थ माणूस गुणवान व समजदार असण्याची आवश्यकता असते येथ पर्यंत ही कविता वाचकास नेते.
अशा कवितेचा अर्थ समजून घेताना प्रियकर प्रेयसी हा मुद्दा आलेला आहे.तो येण्याचे कारण *वाचकांची काही गृहितके असतात*, हे असावे.कित्येकदा पहिल्या काही ओळी वाचून पुढे वाचायचे की नाही हे ठरवले जाते. वास्तविक कवितेची प्रत्येक ओळ अनुभव कक्षा पुढे सरकवत असते.
ओठ मिटलेले असतात.अनेक प्रश्न कोंडलेल्या स्थितीत रहातात. मग अश्रूंना वाट मिळते ते
कोरडे होतात.
“नैनों में मगर कितने मौसम ढलते हैं”।।
याचे कारण पुढच्याच ओळीत कळते.
“कल तक जो अपने थे, आज अजनबी हैं,”
पण हे नाते केवळ प्रियकर प्रेयसी नसून संपर्कातील अनेक लोकांशी आहे. ते प्रत्येकाच्या अनुभवाशी जोडलेले आहे.
कोणत्याही कवितेचे वाचन मला कठीण वाटते. सगळे संबंध लगेच लक्षात येत नाहीत.
निवांत सायंकाळी आठवणी येतात. तेव्हा
“सूखे हुए पत्ते भी बीती बातें कहते हैं”।
या ओळीत सुखे पत्ते ही प्रतिमा बरेच काही सांगून जाते. आधी रसरशीत, तजेलदार पान समोर येते. नंतर दाहक सूर्य रस शोषक वाटतो. अर्थात हे प्रतिक अपरिहार्य परिस्थितीचे आहे. जीवनामध्ये हे सारे टाळता येत नाही,म्हणून ते कवितेत प्रकटते.
दृष्य प्रतिमा अर्थ ठळक करणाऱ्या आहेत. उदा. ख्वाब,खामोश लब, यादों की छांव,सुखे पत्ते इ.
आणखी तीव्र इच्छा असली तरी पूर्वस्थिती येऊ शकत नाही हे खरेच. यातून कोणतेही निर्णय घेताना पुढे चुकल्या सारखे वाटू नये हा विचार करावयास पाहिजे हा संदेश आपोआप मिळतो.
मूळ कविता : प्रज्ञा घोडके
रसग्रहण : अशोक जवळेकर
