You are currently viewing मयूरपंखी आठवणींचा पिसारा
Oplus_16908288

मयूरपंखी आठवणींचा पिसारा

*श्रीशब्द साहित्य समूह तथा जागतिक साकव्य विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ. स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम भावगीत*

*मयूरपंखी आठवणींचा पिसारा*

तुझ्या पापण्यातला सावळा श्रावण मनी झुलतो
मयूरपंखी आठवणींचा कसा पिसारा फुलतो ||धृ||

हृदयात माझ्या दाटून येत तुझं अबोल गीत
एकांताच्या निशिगंधाने गंधाळते तुझीच प्रीत
तुझ्या आठवांचा गंध हलके श्वासात दरवळतो
मयूरपंखी आठवणींचा कसा पिसारा फुलतो ||1||

सांज उतरता वाटेवरती मज ती तुझेच रूप वाटे
घोंगावणाऱ्या वाऱ्यासंगे हळवी तुझीच ओढ दाटे
तुझ्या सहवासाचा क्षण स्मरता उरी मोहरतो
मयूरपंखी आठवणींचा कसा पिसारा फुलतो ||2||

एकट्या त्या मन पाखराला तुझं आभाळ पेलते
तारकांनी भरल्या नभात तुझी साद रात्र झेलते
पाहुनी हसताना चांदणीला शुक्रतारा भुलतो
मयूरपंखी आठवणींचा कसा पिसार फुलतो ||3||

तुझ्या पापण्यातला सावळा श्रावण मनी झुलतो
मयूपंखी आठवणीचा कसा पिसारा फुलतो || धृ ||

सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
7066998796

प्रतिक्रिया व्यक्त करा