You are currently viewing अमरसेन सावंत मित्रमंडळ आयोजित डबलबारी सामन्याचे मा.आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

अमरसेन सावंत मित्रमंडळ आयोजित डबलबारी सामन्याचे मा.आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

अमरसेन सावंत मित्रमंडळ आयोजित डबलबारी सामन्याचे मा.आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

कुडाळ

डिगसचे माजी सरपंच कै. शंकर उर्फ बाळू गावडे आणि माजी आमदार कै. पुष्पसेन उर्फ नाना सावंत यांच्या स्मरणार्थ अमरसेन सावंत मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी पणदूरतिठा येथील श्री गणेश मंदिरासमोरील पटांगणात तिरंगी डबलबारी भजनांचा आमने-सामने जंगी सामना आयोजित करण्यात आला होता.या तिरंगी डबलबारी सामन्याचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भजनी बुवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव नाईक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. डबलबारी सामन्याला भजन रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. याप्रसंगी अमरसेन सावंत, भूपतसेन सावंत, नागेंद्र परब, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, जयभारत पालव, राजू कविटकर, रवी कदम, मंडळाचे अध्यक्ष बाबू सावंत,अणाव सरपंच लीलाधर अणावकर, डिगस सरपंच पूनम पवार,उपसरपंच रुपेश पवार, हुमरमळा सरपंच समीर पालव, पोलीस पाटील उत्तम पालव, ज्येष्ठ मार्गदर्शक सावळाराम अणावकर, विनायक अणावकर,भिवाजी सावंत, डबलबारीचे बुवा दीपक नानचे, दिनेश वागदेकर,उदय पारकर, बाळू पालव, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, प्रदीप गावडे, श्री शिरोडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा