You are currently viewing मालवणच्या गीतांजलीची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड

मालवणच्या गीतांजलीची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड

मालवणच्या गीतांजलीची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड

एनसीसीच्या प्रशिक्षणाचा फायदा; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

मालवण :

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची माजी सिनिअर अंडर ऑफिसर गीतांजली चंद्रकांत चव्हाण हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेतील गुणवत्तेच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.
गीतांजली ही ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीअंतर्गत कार्यरत होती. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान एनसीसीच्या माध्यमातून तिने शिस्त, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता आणि देशसेवेची भावना आत्मसात केली. महाविद्यालयाचे एनसीसी विभागप्रमुख तथा असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
गीतांजलीच्या यशाला भावनिक किनार आहे. काही महिन्यांपूर्वी अपघातात तिच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही तिने खचून न जाता ध्येयाचा पाठपुरावा केला. कठीण परिस्थितीत मिळवलेले हे यश तिच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे प्रतीक ठरले आहे.
यावेळी डॉ. खोत यांनी विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. एनसीसी प्रशिक्षणामुळे पोलीस, सैन्यदल, नौदल तसेच विविध सुरक्षा सेवांमध्ये करिअर घडविण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
गीतांजलीच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते, कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, तहसीलदार गणेश लव्हे, नगरपालिकेचे पदाधिकारी, ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेखर, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर, प्राध्यापकवर्ग आणि एनसीसी कॅडेट्सनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा