You are currently viewing बाप तर बापच असतो
Oplus_16908288

बाप तर बापच असतो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप तर बापच असतो* 

 

बाप तर बापच असतो

तुमचा आमचा सगळ्यांचा

आपला असतो

 

आई जन्म देते

ती सगळ्यांची होते

बापाला कोण विचारतो

तो रागावतो, धाकात ठेवतो

चुकल्यास मारतो

त्याच्यात आम्ही एवढेच पाहतो

 

तो राबराब राबतो कष्ट करतो

लढतो, वार झेलतो

परिस्थितीचे चटके सोसतो

संसारासाठी स्वतःला झिजवतो

मरमर मरतो

हे आम्ही कुठे पाहतो

बाप कोणाला कळतो

सुखात सोबती

आणि

दुःखात ढाल बनतो

लेकरांसाठी

स्वतःच्या हाडाची काडं करतो

 

आभाळासारखं काळीज

संकटात सावली होतं

बापाशी जन्माचं नातं असतं

त्याला समजून घ्यायचं असतं

बाप नावाचं पिकलं पान

सोन्यासारखं जपायचं असतं

आश्रमात सोडायचं नसतं

आपल्या नावा अगोदर

त्याचं नाव मोठं करायचं असतं

पितृ ऋण फेडायचं असतं

 

कारण

बाप तर बापच असतो

तुमचा आमचा सगळ्यांचा

आपला असतो…

आपला असतो…

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा