You are currently viewing मतदार यादीत नाव नोंदणीसाठी फॉर्म नमुना 6 भरण्यासाठी 26 ऑक्टोबरची मुदत
Oplus_16908288

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी फॉर्म नमुना 6 भरण्यासाठी 26 ऑक्टोबरची मुदत

सांगली : प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म नमुना ६ भरण्याची अंतिम मुदत २६ ऑक्टोबर २०२६ आहे. संबंधित मतदारांनी विहित मुदतीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन २८२-सांगली विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, दिनांक 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम – २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यांच्याकडून गणना पत्रक (Enumeration Form) भरून घेण्याची प्रक्रिया सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्तरावर पूर्ण करण्यात आलेली आहे. याबाबतची प्रारूप मतदार यादी दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या कालावधीत ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहे, तसेच यापूर्वी मतदार यादीमध्ये नाव नसलेले व दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या सर्व मतदारांना फॉर्म क्रमांक 6 ऑनलाईन किंवा त्यांच्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी / मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज भरता येणार आहे. फॉर्म नमुना 6 भरण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2026 आहे.

दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द झालेली प्रारूप मतदार यादी https://voters.eci.gov.in/download-croll?stateCode=913 या लिंकवरून पाहता येईल किंवा पुढील QR कोड स्कॅन करून पाहता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा