पोलीस उपअधीक्षक यास्मीन इनामदार
सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
केन्द्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार प्रतिवर्षी देशामध्ये सर्वत्र दक्षता जागरुकता सप्ताह साजरा केला जातो. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ ते दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जागरुकता सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागो सांगलीचे पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, सप्ताह कालावधीगध्ये प्रामुख्याने भ्रष्टाचार विरोधातील कारवाईसंबंधी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक संघटना व गाव पातळीवर नागरिकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली जाणार आहे. विविध शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी घोषवाक्यांचे बॅनर्स, स्टीकर्स लावले जाणार आहेत.
राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानित मंडळे/संस्था यांचे अधिकारी/कर्मचारी, महापालिका /नगरपालिका / जिल्हा परिषद, ग्रामपंचायत येथील अधिकारी, कर्मचारी इ. लोकसेवकांचे भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास अगर लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबतची तक्रार पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, बदाम चौक, पोलीस लाईन शेजारी, सांगली टोल फ्री नंबर 1064, मोबाईल क्रमांक 940 404 1064 फोन क्रमांक 0233-2373095 येथे किंवा पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, सेंट्रल बिल्डींग, सी बॅरॅक फोन क्रमांक 020-26122134 वर संपर्क साधावा. तसेच मोबाईल अॅप (डाऊनलोड करण्यासाठी www.acbmaharashtra.net) चा वापर करावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध विभागामार्फत भ्रष्टाचारी लोकसेवकांविरुध्द पुढील प्रमाणे कारवाई करण्यात येते.
अपसंपदेची चौकशी (Disproportionate assots)
या प्रकारामध्ये नावानिशी किंवा निनावी अर्जावर देखील चौकशी केली जाते. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची घर, मोटारगाड्या, दुकाने, प्लॉट, शेतजमिनी इत्यादी मालमत्ता भ्रष्टाचारातून मिळवली असल्याबाबतचे तक्रारीवरुन चौकशी करण्यात येते. तक्रारीत अशी स्थावर मालमत्ता कोठे आहे याबाबत प्राथमिक व अधिकृत माहिती असणे जरुरीचे आहे.
पडताळणी व लाचेचा सापळा (Verification & Trap)
या प्रकारामध्ये तक्रारदाराने प्रत्यक्ष हजर राहून लोकसेवकाविरुच्द लाचेच्या मागणीबाबत केलेल्या तक्रारीवरुन लाचेचा सापळा आयोजित करुन भ्रष्ट लोकसेवकास रंगेहाथ पकडून कारवाई केली जातो.
पदाचे दुरुपयोगाबाबतची चौकशी (Misconduct)
या प्रकारामध्ये लोकसेवकाने त्याच्या पदाचा दुरुपयोग करुन शासकीय संपत्तीचा अपहार करणे किंवा स्वतःचे फायद्यासाठी वापर करणे अथवा इतरांना तसा वापर करू देणे अशा प्रकारामध्ये संबंधित लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्यात येते. अशा प्रकारामध्ये भ्रष्टाचार आढळून आल्यास संबंधित खात्याचे प्रभारी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे त्या तक्रारी पाठवितात.
