You are currently viewing बं ध न

बं ध न

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बं ध न*

 

उलटून गेले वर्ष असेच

नाही बंधन मजवर काही

दाही दिशांना फिरून आलो

सर्वत्र पहातोय दडपशाही

//1//

काळोखाचा थेंब कोवळा

अजून पानावर प्रकाशतो

कुठे लागतो त्याला परवाना

दाही दिशांना तो फिरतो

//2//

असून जवळीक दोघांमधली

अवेळी गळले *पान उगाच*

कुठे नव्हता छोटा ओरखडा

नव्हता आईचा जराही काच

//3//

मनी ठेवून *संभ्रम* थोडा

नाही लिहिलीस दोन अक्षरे

लटकत आहे संशय भोवऱ्यात

मिटली असती क्षुद्र अंतरे

//4//

मिळेल जर का जन्म पुन्हा

*घेईन आधार पानाचा*

होऊन छोटा हिरवा टोळ

देईन आधार मज खांद्याचा

//5//

खुणावतो आहे दूर असून

प्रकाश छोट्या पणतीचा

छळतो आहे *थेंब इवला*

गालावरती ओघळण्याचा

//6//

अजून आहे *आशा वेडी*

करून टाकशील माफ मला

खात्री आहे *मज ह्वृदया*

*कळले हळव्या अश्रूला*

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

2709/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा