You are currently viewing आपण तिथेच चुकतो

आपण तिथेच चुकतो

सकाळ होते आपण उठतो,
आंघोळी आटोपून देवपूजा करतो.
चहा नाश्ता देखील होतो,
मुले झोपलेली असतात,
त्यांना कुठे देव्हारा दाखवतो?
पण…
आपण तिथेच चुकतो..

घरातून निघताना न सांगताच जातो,
कुठे जातो कधी येणार,
कशाचाही पत्ताच नसतो.
मुलं आपलंच अनुकरण करतात,
आपण दोष त्यांनाच का देतो?
पण…
आपण तिथेच चुकतो…

मोकळा वेळ टीव्हीसमोर जातो,
मोबाईल वर खेळ खेळण्यात,
सर्वात जास्त आनंद मानतो.
मुलांना ओरडून अभ्यासाला बसवतो,
आपण त्यांना कधी वेळ देतो?
पण…
आपण तिथेच चुकतो..

मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारतो,
इकडच्या तिकडच्या उगाच बाता करतो.
मुलं चारवेळा हाका मारतात,
आपण मात्र त्यांच्यावर चिडतो.
आपल्या वर्तनातून मुलांना,
आपण कसला आदर्श देतो?
पण…
आपण तिथेच चुकतो..

लहान वयातच मुलांना गाडी शिकवतो.
शिकवणीला सोडण्याचे थोडेसे,
आपलेच कष्ट आपण वाचवतो.
मुलं बेभान होतात हवेत जातात,
आपण का संकट ओढून घेतो?
पण…
आपण तिथेच चुकतो..

मनाला वाटेल तेव्हा हॉटेलात जातो,
आठवड्यातून चारदा स्वतःच,
होम डिलिव्हरी मागवतो.
घरच्या चवीपेक्षा मस्त,
बाहेरची चव समजतो.
मुलांना हॉटेलची चव दुसरं कोण लावतो?
पण…
आपण तिथेच चुकतो..

मुलांचा प्रश्न आपल्यास
बऱ्याचदा तापदायक वाटतो.
प्रेमळ उत्तराची अपेक्षा असते,
आपण उगाच त्यांच्यावर रागावतो.
आपण तरी कुठे त्यांना समजून घेतो?
पण…
आपण तिथेच चुकतो..

मुलं ऐकेनाशी झाली की,
चिंता करत बसतो.
उठसुठ सूट देऊन सवय आपण लावतो.
समजावण्यापेक्षा आपण त्यांचा तिरस्कार करतो,
म्हणून मुलं बिघडतात हे कुठे जाणतो.
आपल्या मनातलं कधी त्यांच्याशी बोलतो?
पण…
आपण तिथेच चुकतो..

(दिपी)✒️
©दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + four =