You are currently viewing संसार सांभाळणं म्हणजे

संसार सांभाळणं म्हणजे

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*संसार सांभाळणं म्हणजे..*

संसार सांभाळायची
कला आहे एक
हाताळायचे अनेक
प्रश्न…..

लहान थोर
सगळ्यांचा करायचा विचार
तोच आधार
जीवनाला….

मने सांभाळता
होते कधी निराशा
जागवावी आशा
विश्वासाने…

वैयक्तिक सामाजिक
आर्थिक प्रश्न सोडवायचे
यशस्वी चालवायचे
घर….

संत महात्म्यांचा
वेगळा असतो संसार
आध्यात्मिक विचार
समाजात….

भगवंत सांभाळतो
त्रैलोक्याचा भव्य संसार
पंचमहाभूतांचा आधार
सोबतीला….

संसार सांभाळण्यास
हवे मनापासून सहकार्य
मनाचे औदार्य
सफलतेसाठी…..!!

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा