You are currently viewing वेंगुर्लेतील शिवसेना शाखेत वैभव नाईक यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन

वेंगुर्लेतील शिवसेना शाखेत वैभव नाईक यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन

सपत्नीक उपस्थिती; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेंगुर्ले येथील शिवसेना शाखेत प्रतिवर्षाप्रमाणे श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या निमित्ताने कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सपत्नीक शाखेला भेट देऊन श्री दुर्गामातेचे दर्शन घेतले.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने वैभव नाईक यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

याप्रसंगी स्नेहा वैभव नाईक, वेंगुर्ले उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, उपतालुकाप्रमुख सुमन कामत, वेंगुर्ले शहरप्रमुख शैलेश परुळेकर, सुजित चमणकर, अजित राऊळ, महिला आघाडी तालुका संघटक साक्षी चमणकर, डीजी कक्ष तालुका समन्वयक ओंकार पंडित, अजिंक्य खोत, डेलिन डिसोझा, वैभव फटजी, अभि मांजरेकर, अपेक्षा बागायत, कोमल सरमळकर, सुहास मेस्त्री, दिलीप राणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा