You are currently viewing फोंडाघाटमध्ये दीड तास तुफानी पाऊस; वातावरणात गारवा

फोंडाघाटमध्ये दीड तास तुफानी पाऊस; वातावरणात गारवा

फोंडाघाटमध्ये दीड तास तुफानी पाऊस; वातावरणात गारवा

दसऱ्यापूर्वी पावसाचे पुनरागमन; बळीराजाची तारांबळ, वीजपुरवठाही खंडित

फोंडाघाट :

फोंडाघाट परिसरात तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. दसऱ्याच्या आगमनापूर्वी झालेल्या या पावसाने परिसरात वातावरणात गारवा निर्माण झाला. सुमारे दीड तास सतत तुफानी पाऊस पडत असल्याने जनजीवनावर परिणाम झाला.
अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी अर्थात बळीराजाची तारांबळ उडाली. पावसामुळे काही काळ परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. महिनाभरानंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, मात्र अचानक झालेल्या पावसामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा