You are currently viewing जिल्हा माहिती कार्यालयाच्या मोबाईल व्हॅनचा शुभारंभ; योजनांची माहिती आता गावोगावी
Oplus_16908288

जिल्हा माहिती कार्यालयाच्या मोबाईल व्हॅनचा शुभारंभ; योजनांची माहिती आता गावोगावी

नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; ५ व्हॅनद्वारे सामाजिक न्याय व लोककल्याणकारी योजनांची जनजागृती

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यातील विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजना गावागावांत पोहोचण्यास मदत होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) आणि अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या ५ मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध भागात जाऊन सामाजिक न्याय विभाग तसेच इतर शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहेत.

पोलिस कवायत मैदान येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी मोबाईल व्हॅनद्वारे राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत पालकमंत्री राणे यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा