ना पोस्टर, ना बुके, ना सांस्कृतिक कार्यक्रम दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बंधारे, महाआरोग्य शिबिर आणि सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याची जणू नवीन प्रथाच भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी घालून दिली असून लोकप्रतिनिधींनी त्यांचा आदर्श घ्यावा असेच जणू ते आपल्या कृतीतून सांगत असावेत. वाढदिवस म्हटला की, शहरभर, रस्तोरस्ती आपण आपल्या नेत्याचे किती जवळचे आहोत किंवा आपला नेता किती मोठा आहे हे दाखविण्याची स्पर्धाच लागलेली असते आणि ही स्पर्धा करताना भले मोठे पोस्टर लावून पैशांचा अपव्यय तर होतोच परंतु शहर विद्रुपीकरणास ते पोस्टर कारणीभूत ठरतात. यावर्षी संपूर्ण राज्यात पावसाने प्रमाण अगदीच नगण्य राहिल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. अशावेळी सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळत असून येत्या काही दिवसात महागाई भडकण्याची आणि पिण्याच्याही पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीत बडेजाव करून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा पोस्टरबाजी न करता, फुलांचे बुके, हार यांच्यावर खर्च करण्यापेक्षा पैशाची बचत करून दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी गावोगावी वहाळ, नाले, नदीवर बंधारे घालून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना खऱ्या अर्थाने राबविण्याची सुरुवात विशाल परब यांनी केली असून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महाआरोग्य शिबिर घेऊन आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्याचा अभिनव उपक्रम हाती घेऊन जनतेचा सेवक म्हणून आपली सेवा जनतेच्या चरणी रुजू करून विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करत विशाल परब यांनी आदर्श घालून दिला आहे.
विशाल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि विशेषतः सावंतवाडी मतदारसंघातील भाजपचे एक आक्रमक आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पूर्वी नारायण राणे यांच्या जवळ असलेले विशाल परब गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र परब यांचे विश्वासू आणि अत्यंत जवळचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख बनली आहे. सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून त्यांनी जनतेच्या मनात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर जनतेच्या दरबारात न्याय मिळविण्यासाठी त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये आमदारकीचे तिकिट न मिळाल्यामुळे युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु निवडणूक झाल्यानंतरही त्यांची भाजपच्या विचारसरणीशी निष्ठा कायम राहिली. तसेच, मतदारसंघात असलेली त्यांची ताकद आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे लक्षात घेऊन ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांचे निलंबन अधिकृतपणे मागे घेण्यात आले आणि त्यांची भाजपमध्ये सन्मानाने ‘घरवापसी’ झाली. भाजपमध्ये पुनरागमन झाल्यानंतर आता ते सावंतवाडी मतदारसंघात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती) आणि पुढील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
विशाल परब यांनी विविध उपक्रम आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर राबविले आहेत. ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघात जलसंधारणासाठी ५० वनराई बंधारे बांधण्याची मोहीम त्यांनी राबवली, दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’ आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. ज्याद्वारे अनेक गरजू लोकांना देवदर्शनाची संधी मिळाली. तसेच त्यांच्यासाठी विविध जयपूर फूट आणि व्हीलचेअर वाटप शिबिरेही घेतली. स्थानिक पातळीवर क्रीडा संघ आणि सामाजिक उपक्रमांना ते सातत्याने मदत करतात. आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे आणि स्थानिक तरुणांना वाव देण्यासाठी भव्य क्रिकेट व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन ते सातत्याने करत असतात.
जनसामान्यांचा हक्काचा आवाज आणि विकास ध्यास घेऊन समाजहितासाठी कार्यरत असणारे, वनराई बंधारे, दिव्यांग बांधवांची सेवा आणि सदैव जनतेच्या सुखादुःखात धावून जाणारे सावंतवाडीचे लोकप्रिय नेतृत्व विशाल परब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
आपल्या हातून अशीच निरंतर जनसेवा घडत राहो, हीच सदिच्छा.
🎉 जनसेवक विशाल परब यांना संवाद मिडियाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
