You are currently viewing रायफल शूटिंग स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या रोहन घावरेची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

रायफल शूटिंग स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या रोहन घावरेची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

रायफल शूटिंग स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या रोहन घावरेची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

सावंतवाडी

जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी या प्रशालेतील विद्यार्थी रोहन घावरे याने उल्लेखनीय यश संपादन केले.
रोहनने पीप साईट एअर रायफल या प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या यशाच्या जोरावर त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रोहनच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक-संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, क्रीडाशिक्षक श्री. भूषण परब तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले व विभागस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा