You are currently viewing उपसाबंदी असणाऱ्या तलावातून पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

उपसाबंदी असणाऱ्या तलावातून पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

उपसाबंदी असणाऱ्या तलावातून पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली : प्रदीप जोशी

ज्येष्ठ पत्रकार दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. ट्रिगर 1 मध्ये दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील उर्वरित पीकपंचनामे आठवडाअखेरीस पूर्ण करावेत. उपसा सिंचन योजनांद्वारे वितरित होणाऱ्या जत तालुक्यातील मध्यम प्रकल्प व लघुपाटबंधारे तलावावर उपसाबंदी लागू असतानादेखील पाण्याची अनधिकृत उचल किंवा पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी येथे दिले.
दुष्काळी उपाययोजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी ड़ॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, आदिंसह पशुसंवर्धन, महावितरण, भूजल सर्वेक्षण, लघुपाटबंधारे, मृदसंधारण, पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष तर सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे, नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे टंचाई कृती आराखडे तयार ठेवावेत. मागणीप्रमाणे तातडीने टँकर्सपुरवठा करावा. चारा टंचाई टाळण्यासाठी शासकीय गायरान जमिनीवर चारा लागवड करण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्ह्यात कालपर्यंत खातेदारांच्या संख्येनुसार 79.01 टक्के, तर क्षेत्रफळानुसार 79.43 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पीक पंचनामे तातडीने आणि प्राधान्याने पूर्ण करावेत. ई पीक पाहणीची कार्यवाहीही गतीने करावी. दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन (ग्रामीण) अंतर्गत संबंधित सर्व विभागांनी नियोजन करावे. कामे सेल्फवर मंजूर करून ठेवावीत. त्यामुळे स्थानिक स्तरावर मागणीप्रमाणे कामे उपलब्ध करून देता येतील, असे ते म्हणाले.
उपसा सिंचन योजनांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यासह पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देऊन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब आहे. त्यामुळे, सिंचन योजनांच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवावे आणि पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींवर तातडीने कार्यवाही करावी. उपसा सिंचन योजनांद्वारे वितरित होणाऱ्या पाण्याची अनधिकृत उचल किंवा पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

_________________________
*संवाद मीडिया*

*रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे*

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी* मध्ये *नर्सिंग* क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.*(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष *2026-2027*

🔸 *कोर्सचे नांव-

💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*

•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*

•Eligibility- 12th Pass Any Stream

• Duration : 3 Years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*

*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*संधी* –

🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*

*पत्ता:*
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612

*📞 संपर्क:*

*9960906947 / 9422620047*

कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204123/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा