सांगवे गावच्या सुपुत्राचा होणार राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान…..

सांगवे गावच्या सुपुत्राचा होणार राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सांगवे (केळेवाडी) गावचे सुपुत्र पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद भाऊ सावंत-पटेल यांचा २६ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रपती पोलीस पदकाने (President Medal for Distinguised Service Republic Day 2021) सन्मानित करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद सावंत-पटेल यांच्या पोलीस दलातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील सुपुत्राला राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येत असल्याने हा जिल्ह्याचा देखील सन्मान आहे. सावंत-पटेल उत्कर्ष मंडळातर्फे देखील पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद सावंत-पटेल यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत राहो अशा शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा