You are currently viewing परतीच्या पावसाने फोंडाघाटला झोडपले; बळीराजाच्या डोळ्यात पाणी

परतीच्या पावसाने फोंडाघाटला झोडपले; बळीराजाच्या डोळ्यात पाणी

परतीच्या पावसाने फोंडाघाटला झोडपले; बळीराजाच्या डोळ्यात पाणी

लोरे रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; साप्ताहाच्या शेवटच्या रात्री पावसाने दडी मारावी, अशी व्यापारी व नागरिकांची अपेक्षा

फोंडाघाट, प्रतिनिधी :
फोंडाघाट परिसरात काल आणि आज परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तसेच व्यापारीवर्गाची धावपळ उडवली. वारा आणि वादळी पावसामुळे परिसरात मोठा परिणाम दिसून आला. काल लोरे रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
परतीच्या पावसामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम होत असून, बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. फोंडाघाट येथे सुरू असलेल्या श्री राधाकृष्ण मंदिराच्या हरिनाम सप्ताहाची आज शेवटची रात्र आहे. त्यामुळे आज तरी पावसाने विश्रांती घ्यावी, अशी अपेक्षा व्यापारी, भाविक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा