You are currently viewing औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमित आढावा –  जिल्हा नियोजन समितीकडून निधी

औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमित आढावा –  जिल्हा नियोजन समितीकडून निधी

औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमित आढावा –  जिल्हा नियोजन समितीकडून निधी

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हयातील 11 रुग्णालयांमध्ये 155 प्रकारच्या औषधांचा किमान 45 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. आवश्यक औषधांच्या यादीनुसार शासनाच्या ई-औषधी या ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर दैनंदिन उपलब्ध औषधांचा साठा अद्ययावत करण्याचे काम संस्था स्तरावर झालेले आहे. स्थानिक पातळीवरील औषधांच्या खरेदीकरीता रुग्णालय स्तरावर शासकिय नियमित अनुदान, रुग्णकल्याण समिती अनुदान उपलब्ध आहे. जिल्हा स्तरावर शासकिय नियमित अनुदान, जिल्हा नियोजन समिती अनुदान, एनएचएम अनुदान, रुग्ण कल्याण समिती, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना हे अनुदान उपलब्ध आहे. या अनुदानातून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या तांत्रिक व प्रशासकिय मान्यतेनुसार औषधे व साहित्याची खरेदी करण्यात येते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी औषधांच्या उपलब्धतेबाबत वेळोवेळी आढावा घेत असून सर्व औषध साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी  दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी 5 ऑक्टोबर 2023 रोजी अधिष्ठाता, वैद्यकिय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच या संबंधित इतर अधिकारी यांची बैठक घेऊन औषधांचा उपलब्ध साठा, मागणी , देण्यात आलेले पुरवठा आदेश व अनुदानाची आवश्यकता याचा सविस्तर आढावा घेऊन औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात रुग्णालयात उपलब्ध ठेवणेबाबत सूचना देऊन औषधांच्या साठ्याविषयी रुग्णालयात तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली 11  रुग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये 1 जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ 100 खाटा, 4 उपजिल्हा रुग्णालये मध्ये 100 खाटांची, 2 कणकवली व सावंतवाडी 50 खाटांची,  2 शिरोडा व वेंगुर्ला 30 खाटांची, 6 ग्रामीण ग्रामीण रुग्णालये दोडामार्ग कुडाळ, मालवण, वैभववाडी, देवगड, पेंडूर कट्टा याप्रमाणे आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या 580 आहे. जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग हे कायमस्वरुपी वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे हस्तांतरित होऊन सदरचे रुग्णालय अधिष्ठाता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय यांचे नियंत्रणाखाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील त्यांचे अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थांकरता औषधे व साहित्याची प्रमाणित यादी दिलेली आहे. त्यानुसार 926 प्रकारची औषधे व 314 प्रकारची उपभोग्य वस्तू सदर यादीत नमूद आहेत. 926 औषधांपैकी 155 प्रकारची आवश्यक औषधे रुग्णालयात रुग्ण उपचाराकरीता नमुद केलेली आहेत. ही सर्व औषधी जरी जिल्हा शासकीय रुग्णालय हे अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडे हस्तांतर झालेले असले तरी जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडून त्यांना औषधी पुरवठा केला जात आहे. तसेच अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी देखील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पुढील 45 दिवसांचा पुरेसा औषध साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती, महात्मा फुले जनआरोग्य  योजना यामधून जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडून योग्य तो पुरवठा करण्यात येत आहे. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना जिल्हा नियेाजन समिती मार्फत 90 लाख रुपये एवढा निधीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

यापुढील कालावधीत पुरेशा प्रमाणात आवश्यक औषधांचा साठ्याची जिल्हास्तरावर खरेदी करून त्यामधून औषधे रुग्णालयांना पुरविण्याकरीता जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना तातडीने रु. 70 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. व गेल्या महिन्यात तातडीच्या औषधांसाठी रु. 10 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून दिला त्यामधून 38 प्रकारची तातडीच्या आवश्यक औषधांचे पुरवठा आदेश देण्यात आले व त्यामधून 26 प्रकारची औषधे प्राप्त झालेली आहेत व उर्वरित 12 प्रकारची औषधे प्राप्त होत आहेत. एनएचएम फ्री ड्रग्ज योजनेतून 21 प्रकारच्या औषधाचे पुरवठा आदेश दिलेले असून त्यामधून तातडीने आवश्यक असणारी श्वान दंश उस प्राप्त झालेली असून उर्वरित औषधे प्राप्त होत आहेत. जिल्हयातील सर्व रुग्णालयांमध्ये शासनाने विहित केलेल्या आवश्यक असणाऱ्या औषधांच्या साठ्याची कमतरता असणार नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा