ओसरगावातील बस थांबा शेडमध्ये भरत परब निश्चल अवस्थेत
ग्रामपंचायत सदस्य राहुल आंगणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती
ओसरगाव : प्रतिनिधी
ओसरगाव गवळवाडी येथील आंबेरकर दुकानाजवळील बस थांबा शेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास असलेले भरत परब हे शुक्रवारी दुपारी एक वाजल्यापासून कोणतीही हालचाल करताना दिसून आले नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य राहुल आंगणे यांच्या निदर्शनास ही बाब आली.
याबाबत पोलीस पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधितांना कळवून कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल होत असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून आवश्यक ती मदत करावी, अशी नम्र विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
